कधीतरी असे वाटते
कि क्षणात विझावे
एक अंधार बनून काळोखाच्या झुल्यातच
झुलत राहावे
एक चैन म्हणून जीवाचा विरंगुळ म्हणून
कधीतरी असे वाटते
हसावे? नवे रडवाच
आसवांच्या पुरात वाहूनच जाव
धो धो संपून जाव
भावनांचा निचरा व्हावा म्हणून
कधीतरी अ से वाटते
ह्या जीवाला बारा वाटावं
पानाशी बोलावं
फुलांना गोंजारावं
वाहत्या नदीला थांबवाव
ओल्या वाळूशी गट्टी करावी
पाण्याशी नात जोडाव
उडनाऱ्या पकोळ्याना
हाक मारावी
वाऱ्याने उडवलेल्या
पानागत हलक व्हाव
माझ्यासाठी मी माझीच व्हावी
म्हणून
जीवात्या जीवलावावा म्हणून ...